नागपूर स्थानकाच्या बाहेर पडल्यावर डाव्या बाजूला सुमारे २-३ मिनिटाच्या अंतरावर, रस्त्याच्या उजवीकडे एका लहानसा टेकडीवर हे श्री गणेश मंदिर आहे. टेकडी गणेश म्हणून ते प्रसिद्ध आहे.
हा गणपती नवसाला पावतो असा अनेकांचा अनुभव आहे. म्हणूनच गणेश भक्तांची येथे नेहमी वर्दळ असते.
ही गणेश मूर्ती बैठ्या स्वरूपाची आणि भव्य, गंभीर व आकर्षक आहे. शेंदुराच्या लेपामुळे मूर्तीला आतापर्यंत चार वेळा चांदीचे डोळे बसविले गेले.
हे एक नागपुरातील प्रेक्षणीय स्थळ आहे. नागपुरातील शुक्रवार तलावाचे पाणी किल्यापर्यंत पूर्वी येत होते. त्यावेळेस भोसले राजे नावेतून दर्शनाला येत होते. पूर्वी या भागावार सैनिकी तळ होता.
Leave a Reply