म्यानमारमधील मंडाले परिसरातील बागन हे प्राचीन शहर आहे.
९ ते १३व्या शतकांदरम्यान हे शहर पागन या राजघराण्याची राजधानी होते. या राजवटीदरम्यान या शहरांत सुमारे दहा हजार बौद्ध मंदिरे,पॅगोडा आणि मठांची निर्मिती करण्यात आली. यातील २२०० मंदिरे सध्या अस्तित्वात आहेत.
२६ चौरस मैल परिसरात या मंदिराची उभारणी करण्यात आली आहे. थाटबिन्यू हे या समुहातील सर्वात मोठे मंदिर आहे. या मंदिर आणि पॅगोडाची जागतिक वारसा यादीत नोंद करण्यात आली आहे.
Leave a Reply