तेनकाशी हे तामिळनाडू राज्यातील तिरुनेलवेल्ली जिल्ह्यातिल एक महत्वाचे शहर आहे. पश्चिम घाटातील पर्वतरांगांच्या पायथ्याशी ते वसलेले असून, समुद्रसपाटीपासून १४३ मीटर उंचीवर आहे. चेन्नई, बंगलोर, कोलम, येथून बसने या शहरात जाता येते. रेल्वेमार्गानेही हे शहर देशाशी जोडलेले असून, चेन्नईहून जाणार्या अनेक गाड्यांना या शहरात थांबा आहे.
कुर्तलम धबधबा प्रसिध्द
तेनकाशी शहराजवळचा कुर्तलम धबधबा प्रसिध्द असून, तो पाहण्यासाठी पर्यटक येथे गर्दी करतात. त्याचबरोबर या शहरातील सारल नावाचा वाद्यवृंदही प्रसिध्द आहे. या वाद्यवृंदात पॉप प्रकारची तामिळबरोबरच हिंदी गाणीही सादर केली जातात.
Leave a Reply