तेझू हे अरुणाचल प्रदेशातील लोहिट जिल्याचे मुख्यालय असलेले एक शहर आहे. या शहरात मिश्मी जमातीच्या लोकांचे वास्तव्य आहे. या जमातीचा इतिहास महाभारत काळापर्यंत मागे जातो. कृष्णाची पहिली राणी असलेली रुक्मिणी ही मिश्मी जमातीची होती, अशी या लोकांची श्रध्दा आहे. खासगी विमाने उतरवण्यासाठी येथे छोटे विमानतळ आहे.
तेझू शहरातील मिश्मी लोकांचा तमलाडू पूजेचा उत्सव प्रसिध्द आहे. प्रत्येकवर्षी तो १५ फेब्रुवारीला साजरा होतो. या राज्यातील सर्व जातीधर्माचे लोक या उत्सवात सहभागी होतात. या काळात येथे असलेल्या परशुराम कुंडात पवित्र स्नान करण्यासाठी देशभरातून भाविक मोठ्या संख्येने येतात.
Leave a Reply