दूरदर्शन म्हणजे “इडियट बॉक्स” महाराष्ट्रात १९७२ मध्ये आला. मुंबई येथे महाराष्ट्र राज्यातील पहिले दूरदर्शन केंद्र २ ऑक्टोबर १९७२ रोजी सुरु करण्यात आले.
सुरुवातीला मुंबई दूरदर्शनचे कार्यक्रम दिवसातून काही ठराविक तासच सुरु असायचे.
या केंद्रासाठी त्यावेळी परदेशातील दूरदर्शन केंद्रांनी मोडीत काढलेली यंत्रणा आयात केली गेली. याच यंत्रणेवर भारतीय अभियंत्यांनी बरीच वर्षे दूरदर्शनचे कार्यक्रम सुरु ठेवले.
तत्पूर्वी भारतात सर्वप्रथम १९५९ मध्ये दिल्ली येथे प्रायोगिक तत्वावर दूरदर्शन केंद्र सुरु करण्यात आले.
Leave a Reply