थेनी हे तामिळनाडू राज्याच्या पश्चिम भागातील एक जिल्हा मुख्यालय असलेले शहर आहे. उत्तम प्रतीची द्राक्षे, वेलदोडे व मिरचीसाठी हे शहर प्रसिध्द आहे. तामिळनाडू राज्यातील दूसरा सर्वात मोठा आठवडी बाजार या शहरात भरतो. रस्ता आणि रेल्वे मार्गाने हे शहर राज्याच्या इतर सर्व भागांशी जोडलेले आहे. हवाई मार्गाने थेनी येथे जाण्यासाठी मदुराई हा जवळचा विमानतळ आहे.
प्रेक्षणीय शहर
थेनी शहरापासून जवळ असलेल्या सुरुलीपट्टी येथील धबधबा प्रेक्षणीय आहे. तसेच मेघमलाई व वेल्लिमलाई नावाची थंड हवेची ठिकाणेही या शहरापासून अगदी जवळ आहेत. वैगाई नदीवरील धरण व परिसर पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी असते.
Leave a Reply