तिरुवनंतपुरम हे केरळ राज्याच्या राजधानीचे शहर आहे. देशाच्या पश्चिम किनारपट्टीवर ते वसलेले आहे. महात्मा गांधीजींनी या शहराचे वर्णन सदाहरित शहर असे केले होते. केरळमधील सर्वाधिक लोकसंख्येच्या शहरांपैकी ते एक आहे. राज्यातील आयटी उद्योगामध्ये ८० टक्के वाटा या शहराचा असून, मोठे आयटी हब येथे आहे.
शिक्षणाचे माहेरघर
तिरुवनंतपुरम हे केरळमधील शिक्षणाचे माहेरघर आहे. केरळ विद्यापीठ, विक्रम साराभाई अंतरिक्ष संशोधन केंद्र, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, राजीव गांधी बायोटेक्नॉलॉजिकल केंद्र यांसारख्या अनेक संस्था या शहरात कार्यरत आहेत.
Leave a Reply