तिरुवल्लूर हे तामिळनाडू राज्यातील एक महत्वाचे शहर आहे. जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या या शहरात वर्ग १ ची नगरपालिका असून मंदिरांचे शहर अशीही त्याची वेगळी ओळख आहे. येथील वीर राघव मंदिर विशेष प्रसिध्द आहे. कूम नदीव्या किनार्यावर वसलेले हे शहर चेन्नईपासून ४२ किलोमीटर अंतरावर आहे. या शहरातील शिव मंदिरही प्रसिध्द आहे.
चाळीस फुटी हनुमान मूर्ती प्रसिध्द
तिरुवेल्लूर येथील ४० फुटी विश्वरुपि पंचमुख हनुमानाचे मंदिर प्रेक्षणीय आहे. हिरव्या रंगाच्या एकाच ग्रॅनाईट खडकामध्ये बनवलेलि हनुमानाची मूर्ती सुंदर आहे. चेन्नई शहराला पाणीपुरवठा जेथून होतो ते पुंडी हे ठिकाण तिरुवल्लूरपासून ९ किलोमीटरवर आहे.
Leave a Reply