तिरुवन्नमलई हे तामिळनाडू राज्यातील एक महत्वाचे शहर आहे. या शहरात विशेष दर्जा असलेली महानगरपालीका आसून, १६.३३ किलोमीटर वर्ग क्षेत्र, तिच्या अखत्यारीत येते. येथील अन्नामालियार मंदिर प्रसिध्द असून, त्याच्यावरुनच शहराचे तिरुवन्नमलई हे नाव पडलेले आहे. या मंदिरात साजरा होणारा कार्तिगाई दीपम सोहळा पाहण्यासाठी हजारो भाविक गर्दी करतात.
तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिध्द
तिरुवन्नमलई हे एक तिर्थक्षेत्र म्हणून आता ओळखले जाऊ लागले आहे. शहरापासून जवळच चार जैन मंदिर असून, तेथे असलेली १६ फूट उंचीची नेमीनाथ यांची मूर्ती प्रक्षणीय आहे. थेनपेन्नयार नदीवरील साथनूर हे धरण येथून अवघ्या २० किलोमीटरवर आहे.
Leave a Reply