
मुंबईतील सिद्धिविनायक, महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ख्याती सर्वदूर पसरलेली आहे. पौराणिक कथेनुसार या मंदिरात शकुंतला आणि दुष्यांत यांचा गंधर्व विवाह झाल्याचे मानले जाते वसई किल्ला जिंकल्यानंतर हे मंदिर बांधले, हा इतिहास आहे. संकष्टी, अंगारकी तसेच मंगळवारी येथे भाविक मोठ्या संख्येने येतात.
मध्य रेल्वेवरील कसारा मार्गावर टिटवाळा हे उपनगरी रेल्वे स्टेशन असून तिथून हे मंदिर तीन किलोमीटर अंतरावर आहे. रेल्वे स्थानकापासून भाविकांची ज्ञान करण्यासाठी रिक्षा आणि टांगे उपलब्ध आहेत.
जय गणेश – ओंम गं गणपतये नमः !!