अकोला जिल्ह्यात नरनाळा, अकोला, अकोट आणि बाळापूर असे किल्ले असून नरनाळा हे अभयारण्य आहे. नरनाळा अभयारण्य हे मेळघाटचे प्रवेशद्वार आहे.
अकोल्यातील राजराजेश्वर, गायगावचा श्री गणेश, वारी भैरवगड चा मारोती, काटेपूर्णाची चंडिकादेवी, पातूरची रेणुका माता ही भाविकांच्या आकर्षणाची मुख्य केंद्रे आहेत.
संत गजानन महाराजांचे शेगांव येथील मंदिर अकोल्याहून ५० किमी अंतरावर आहे.
अकोल्यातील राजराजेश्वराचे मंदिरातील शिव हे अकोल्याचे ग्रामदैवत असून श्रावण महिन्यात येथे मोठी यात्रा भरते.
बार्शीटाकळी तालुक्यातील काटेपूर्णा अभयारण्य व येथील मोठे धरण सुद्धा लोकप्रिय पर्यटनस्थळ आहे.
कारंजा हे दत्त पंथीयांचे व शिरपूर जैन हे जैन लोकांचे देवस्थान जवळच आहे.
Leave a Reply