
डोंबिवली शहर अक्षवृत्त – १९. २१८४३३ ° N आणि रेखावृत्त – ७३. ०८६७१८ ° E वर वसलेले आहे.
डोंबिवली शहराची समुद्रसपाटीपासूनची सरासरी उंची १३. ५३४ मीटर्स (४४. ४०३ फूट) आहे.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस पासून डोंबिवली रेल्वे स्थानकाचे अंतर ४८ किमी आहे. कल्याण रेल्वे स्थानकापासून डोंबिवली रेल्वे स्थानकाचे अंतर ४ किमी असून ठाणे रेल्वे स्थानकापासून डोंबिवली रेल्वे स्थानकाचे अंतर १४ किमी आहे.
पुणे ते डोंबिवली हे अंतर १४६ किमी असून नाशिक ते डोंबिवली १४७ किमी आहे.
डोंबिवलीला सर्वात जवळचा विमानतळ म्हणजे मुंबई हा सुमारे ५० किमी अंतरावर आहे.
रस्तामार्गे डोंबिवलीला पोहोचणे हे तसे पाहिले तर त्रासदायक आहे. ठाणे ते डोंबिवली रस्त्याचे अंतर २७ किमी आहे.
डोंबिवली येथे एक्सप्रेस रेल्वे गाड्या थांबत नाहीत. एकतर कल्याण किंवा ठाणे येथे उतरून डोंबिवलीला लोकलने यावे लागते.
डोंबिवलीतील एम आय डी सी भागात एसटीचे स्थानक आहे. पुणे, नाशिक, धुळे कोंकणातील अनेक नगरे, उत्तर व पश्चिम महाराष्ट्रातल्या अनेक नगरांहून डोंबिवलीसाठी एसटी बसेस उपलब्ध आहेत.
कल्याण एसटी स्थानकातून उतरून रिक्षा किंवा स्थानिक बसने डोंबिवलीला येता येते. मुंबई, पुणे व नाशिक येथून खाजगी टॅक्सी उपलब्ध आहेत.
Leave a Reply