
महाराष्ट्राची राजधानी मुंबई शहरातील वाहतूक व्यवस्थेमध्ये उपनगरीय रेल्वे, बेस्ट, बसेस, रिक्षा, भाड्याच्या गाड्या सामील आहेत.दक्षिण मुंबईत रिक्षा चालवण्यावर बंदी आहे. शहरातील सर्व भाड्याच्या गाड्यांना सीएनजी वापरण्याची सक्ती आहे. शहरातील ८८ टक्के लोकसंख्या परिवहन सेवेचा लाभ घेते.