रत्नागिरी जिल्ह्यातील दळणवळण सोयी

मुंबई-पणजी-कोची हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १७ या जिल्ह्यामधून जातो. हा मार्ग मुंबई-गोवा महामार्ग या नावाने परिचित आहे. सातारा जिल्ह्याला जोडणारा कुंभार्ली घाट, रायगड जिल्ह्याला जोडणारा कशेडी घाट व कोल्हापूरला जोडणारा आंबा घाट हे महत्त्वाचे घाट रत्नागिरी जिल्ह्यात आहेत.
रायगड जिल्ह्यातून आलेली कोकण रेल्वे रत्नागिरी जिल्ह्यातून जाऊन पुढे सिंधुदुर्ग जिल्ह्यातून पणजीकडे जाते. २००८ मध्ये या महत्त्वाकांक्षी कोकण रेल्वे प्रकल्पाला १० वर्षे पूर्ण होत आहेत. कोकण रेल्वे मार्गावर पानवल येथे आशियातील सर्वात उंच पूल (रेल्वे) बांधण्यात आला आहे. याची उंची ६५ मीटर आहे.  याच मार्गावर रत्नागिरीजवळील करबुडे या अत्यंत दुर्गम ठिकाणी आशिया खंडातील सर्वात मोठा, ६ कि.मी. लांबीचा करबुडे बोगदा आहे. जिल्ह्याला सर्वात जवळचे विमानतळ म्हणजे कोल्हापूर येथील विमानतळ होय.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*