मुंबई-आग्रा हा राष्ट्रीय महामार्ग क्र. ३, मुंबई-ठाणे-पुणे-बंगळूर-चेन्नई हा राष्ट्रीय महामार्ग क्र. ४ व मुंबई- अहमदाबाद-दिल्ली हा राष्ट्रीय महामार्ग क्र. ८ हे तीन राष्ट्रीय महामार्ग ठाणे जिल्ह्यातून जातात.
जिल्ह्यात थळ घाट, नाणे घाट व माळशेज घाट हे नाशिक, अहमदनगर व पुणे या जिल्ह्यांना जोडणारे महत्त्वाचे घाट आहेत. भारतातील पहिली रेल्वे १८५३ साली मुंबई ते ठाणे या स्थानकांदरम्यान धावली. जिल्ह्यातून जाणारे तीन प्रमुख लोहमार्ग मुंबई-चेन्नई, मुंबई-कोलकाता व मुंबई-दिल्ली हे आहेत.
खुद्द ठाणे शहर व या जिल्ह्यातील अनेक गावे मध्य रेल्वेच्या माध्यमातून मुंबईला जोडलेली आहेत. येथील स्थानिक रेल्वे सेवेचा फायदा घेऊन लाखो नागरिक रोज व्यवसायासाठी किंवा नोकरीसाठी मुंबईत जातात.
Leave a Reply