
आसाम राज्यातील, उदलगुरी जिल्ह्यातील एक शहर टंगला. पूर्वी हे शहर दरांग जिल्ह्यात समाविष्ट होते. या शहरात अनेक छोटे उद्योग चालत होते. अनेक सांस्कृतीक घडामोडींचे हे शहर केंद्र होते; पण कालांतराने जसे बोडो अतिरेक्यांच्या कारवायात वाढ झाली, तसेतसे टंगलातील वातावरणच बदलून गेले. बोडो आणि रभास जमातीच्या लोकांचे येथे प्रामुख्याने वास्तव्य आहे.
टंगला शहरात प्रामुख्याने आसामी भाषा बोलली जात असली, तरी येथे बोडो, बंगाली, नेपाळी, हिंदी, इंग्रजी या भाषाही काही प्रमाणात बोलल्या जातात. या शहरात अनेक चहाचे मळे असून, हाच येथील उत्पन्नाचा प्रमुख आधार आहे. रस्ते तसेच रेल्वे मार्गानेही या शहरात जाता येते.
Leave a Reply