संयुक्त अरब अमिराती हा मध्यपूर्वेतील एक देश आहे. संयुक्त अरब अमिराती सात अमिराती एकत्र येउन तयार झाला आहे. ह्या सात अमिराती अबु धाबी, दुबई, शारजा, अजमान, उम अल-कुवैन, रस अल-खैमा व फुजैरा ह्या आहेत.
१६व्या शतकाच्या सुरुवातीस येथे पोर्तुगिजांचा शिरकाव झाला. त्यानंतर सुमारे १०० वर्षांनी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने येथे प्रवेश केला. १८२० मध्ये ब्रिटिशांनी येथील राजांशी शांतता करार केला. १८५३ पासून ब्रिटिशांनीच येथील कारभार चालवला तरी त्यांना संपूर्ण सत्ता कधीच मिळाली नही. १९७१ मध्ये येथील शेख यांनी ब्रिटिशांबरोबरचा करार रद्द केला व सहा सदस्यीय समिती स्थापन केली. १९९१ मध्ये अमिरातिने इराकविरुध्दच्या युध्दात संयुक्त फौजांना मदत केली.
राजधानी व सर्वात मोठे शहर :अबु धाबी, दुबई
अधिकृत भाषा :अरबी, इंग्लिश, बंगाली, उर्दु, फारसी
राष्ट्रीय चलन :दिरहाम
सौजन्य : विकिपीडिया
Leave a Reply