वेल्लूर हे तमिळनाडू राज्यातील जिल्हा मुख्यालय असलेले एक शहर आहे. पलार नदीच्या किनाऱ्यावर वसलेल्या या प्राचीन शहरावर वेगवेगळ्या काळात चोल, विजयनगर, राष्ट्रकुट तसेच ब्रिटिश यांची सत्ता होती. ८७.९९५ वर्ग किलोमीटर क्षेत्र या शहराने व्यापलेले असून चेन्नईपासून ते १४५ किलोमीटरवर, तर बंगलोरपासून २११ किलोमीटरवर वसलेले आहे.
प्रेक्षणीय शहर
वेल्लूर हे प्रेक्षणीय शहर असून येथे प्रत्येकवर्षी हजारो पर्यटक भेट देतात. वेल्लूर किल्ला, शासकीय वस्तूसंग्रहालय, सायन्स पार्क, अमिरथी झूलॉजिकल पार्क, जलकांडेश्वर मंदिर, श्रीलक्ष्मी सुवर्णमंदिर, बड़ी मशीद, सेंट जॉन्स चर्च अप्रतिम आहे.
Leave a Reply