विरुधुनगर

विरुधुनगर तमिळनाडू राज्यातील एक महत्त्वाचे जिल्हा मुख्यालय असलेले शहर आहे. मदुराईपासून ते अवघ्या ५३ किलोमीटर अंतरावर असून चेन्नईपासून ५०६ किलोमीटरवर वसलेले आहे. ब्रिटिश काळात एक मोठे व्यापारी केंद्र म्हणून हे शहर उदयाला आले. समुद्रसपाटीपासून ते १०२ मीटर उंचीवर वसलेले असून कोवसीका नदीच्या किनाऱ्यावर आहे.

भारतरत्न के. कामराज यांचे जन्मगाव
भारतरत्न के. कामराज यांचे जन्मगाव म्हणून विरुधुनगरची देशभर ओळख आहे. या शहरातील हवामान वर्षभर प्रामुख्याने |आर्द्रतापूर्ण असून येथे वर्षभरात ७८० मिलीमीटर पाउस पडतो. ६३९ वर्गकिलोमीटर इतके क्षेत्र या शहराने व्यापलेले आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*