मानव (Manav) हे आडनाव थोडं वेगळंच वाटतं ना?
हे आडनाव धारण करणारे फार मोजकेच लोक असतील. मात्र याची कथाही सुरस आहे.
नागपुरात अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या अेका शामने आपले आडनाव सोडून १९ व्या वर्षी मानव हे आडनाव धारण केले. जाती, धर्म, वंश किंवा आनुवंशिकता न दाखविणारे हे आडनाव आहे.
शाम मानव हे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे नेते.
त्यांच्या पत्नीने आपले माहेरचे आडनाव बदलले नाही तर त्यांचा मुलगा आपल्या नावासमोर आअीचे आणि वडिलांचे फक्त नावच लावतो, आडनाव लावीत नाही.
अशाच प्रकारे आडनावाच्या त्याग करुन केवळ आई-वडिलांचे नाव लावणारीही मंडळी महाराष्ट्रात अनेक आहेत.
Leave a Reply