मराठी आडनाव कोशाची सुरूवात
मराठी ज्यांची मातृभाषा आहे अशा कुटुंबांच्या आडनावांचा संग्रह करण्याची, मला आवड निर्माण झाली. या छंदाला, माझ्या आडनावावरूनच, १९६३ च्या मे महिन्यापासून सुरूवात झाली. […]
आडनावांविषयी विविध लेख
मराठी ज्यांची मातृभाषा आहे अशा कुटुंबांच्या आडनावांचा संग्रह करण्याची, मला आवड निर्माण झाली. या छंदाला, माझ्या आडनावावरूनच, १९६३ च्या मे महिन्यापासून सुरूवात झाली. […]
मराठी साम्राज्याच्या अुत्तरेकडील विस्तारामुळं बडोदा, ग्वाल्हेर, अिंदूर, देवास वगैरे संस्थानात हजारो मराठी कुटुंबं स्थयिक झाली आहेत. घरात त्याचं मराठीपण टिकून आहे. पानिपतच्या दारूण पराभवाला 14 जानेवारी 2010 रोजी 250 वर्षे पूर्ण झाली. अेखाद्या घटनेला दारूण अपयश आलं तर त्या घटनेचं पानिपत झालं असा वाक्प्रचारही रूढ झाला आहे. […]
कोणत्याही व्यक्तीत येणारे शारीरिक आणि मानसिक गुणावगुण हे मातापित्यांच्या अनेक पिढ्यांकडून येतात हे आपल्या पूर्वजांच्या बरोबर लक्षात आले होते. हा निष्कर्ष त्यांनी अनुभव आणि निरीक्षणावरून काढला. विज्ञानीयदृष्ट्या आता अगदी निर्विवादपणे सिद्ध झाले आहे की, आनुवंशिक गुणधर्म हे अपत्यपिढ्यांमध्ये, गुणसूत्रांमुळे म्हणजे क्रोमोसोम्समुळे येतात. […]
गेल्या कित्येक शतकापासून प्रत्येक घराण्याच्या अनेक पिढ्यात पुरूषांचीच मक्तेदारी चालू आहे. अपत्याच्या नावासमोर वडिलांचेच नांव लावले पाहिजे आणि वडिलांचेच आडनाव लावले पाहिजे असा दंडक आहे. पित्याचेच गोत्र मुलाला प्राप्त होते. […]
आपले आडनाव कसेही असले तरी आपण ते जन्मभर मोठ्या अभिमानाने आपल्या नावासमोर लावतो. आपला समाज पुरूषसत्ताक आहे म्हणून मुलाच्या किवा मुलीच्या नावासमोर वडिलांचे किवा पतीचे नांव आणि वडिलांचे किवा पतीचेच आडनाव लावण्याची प्रथा आहे. […]
आडनाव कोणत्या कारणामुळे बदलले जाअील याला काही नियम लावता येणार नाहीत. अॅडमिरल विष्णू भागवत यांचे मूळ नाव विष्णूकुमार शर्मा असे होते. सर्व गुण समान असले तर वरचा नंबर किंवा पदोन्नती, आडनावातील अंग्रजी वर्णाक्षराच्या आधारे देतात. शर्मामधला अेस् बराच खाली आहे. सहाध्यायी तर दास वगैरे आडनावाचे आहेत. म्हणून शर्मा जाअून तेथे बी पासून सुरू होणारा भागवत आला. […]
कुटुंबाला आणि पर्यायाने व्यक्तीला आडनाव असतेच असते. ही प्रथा जवळजवळ सर्वच देशात पाळली जाते. मराठी समाजही अपवाद नाही. आनुवंशिकतेचे साधर्म्य दर्शविण्यासाठी, कुटुंबांच्या आडनावांची प्रथा, मुळात रूढ झाली असावी. परंतू कालांतराने या प्रथेचा गैरवापर होअून विचित्र, विक्षिप्त, लाजिरवाणी, भयानक आणि हास्यास्पद आडनावे निर्माण झाली आणि ती पिढ्यानपिढ्या चालूही राहिली. […]
अेखादे आडनाव मराठी आहे याची खात्री करून घेण्यासाठी निरनिराळया कसोट्या लावाव्या लागतात. […]
गोत्र हे देखील कुटुंब आणि व्यक्ती ओळखण्याचे साधन आहे. आणि त्याबद्दल विज्ञानीय दृष्टीकोनातून विचार करणे आवश्यक आहे. निरीक्षणे आणि अनुभवावरून मानवाने ज्ञान मिळविले आहे. कदाचित निरीक्षणे आणि अनुभवावरून त्याच्या लक्षात आले असावे की, पितृवंशाकडून जास्त प्रभावी गुणसुत्रे, अपत्यात प्रवाहित होत असावीत. म्हणूनच नर अपत्यांना, पित्याचे आडनाव आणि गोत्र दिले जाते. […]
भारतात, काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत आणि पश्चिमेपासून पूर्वेपर्यंत वेगवेगळ्या भाषिकांचे, संस्कृतींचे, चालीरिती आणि परंपरा जपणारे प्रदेश आहेत. पंजाब, अुत्तर प्रदेश, बंगाल, राजस्थान, गुजराथ, महाराष्ट्र, कोंकण-कारवार, कर्नाटक, आंध्र, तामीळनाड, केरळ वगैरे प्रदेशात, कुळ ओळखण्याच्या वेगवेगळ्या पध्दती आहेत. म्हणजेच […]
Copyright © Marathisrushti.com 1995-2022 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Interpole Technologies | Smart Solutions