मडगाव (गोवा) येथून, ‘गोमन्त कालिका’ नावाचं मासिक प्रसिध्द होतं. त्यात दैवज्ञ ब्राम्हण समाजाची खूप माहिती प्रसिध्द होत असते. जगन्नाथ अुर्फ नाना शंकरशेट आणि नाथमाधव (द्वारकानाथ माधव पितळे, १८८२ ते १९२८ .. केवळ ४६ वर्षे) या दोन व्यक्ती, दैवज्ञ ब्राम्हण समाजातल्या सुप्रसिध्द व्यक्ती समजल्या जातात. या मासिकात मला, खूप मराठी ‘कर’ भावी आडनावं आढळली. तसेच मुलांमुलींचीही, नादमधूर नावं आढळली. दैवज्ञ म्हणजे दैव-ज्ञ … दैव .. नशीब जाणणारे असा अर्थ होतो.
बहुतेक आडनावं, निवासदर्शक ‘कर’ जोडून झालेली आहेत. गोव्याकडचे ‘कर‘ आणि कोकणातले ‘कर‘ यांच्यात बराच घोटाळा होण्याचा संभव आहे.
अडवलपालकर, अणवेकर, अुसपकर, ओटवणेकर, कल्याणकर, काडणेकर, कारेकर, कुडाळकर, कोलवेकर, कोळंबकर, खांडेपारकर, खेडेकर, चोडणकर, चोणकर, डिचोलकर, दुतळेकर, धामणेकर, धायकेरीकर, नागझरकर, नागवेकर, नार्वेकर, नास्नोडकर, नेतलकर, नेतुर्लीकर, पाडगावकर, पालेकर, पावसकर, पुळेकर, प्रियोळकर, पेडणेकर, बायकेरीकर, बांदिवडेकर, बांदोडकर, बेनकर, बोरकर, बोरीकर, मडकअीकर, मसूरकर, मालपेकर, माशेलकर, माहिमकर, मुसलोणकर, म्हार्दोळकर, म्हाप्रोळकर, रामनाथकर, रायकर, रिवणकर, रेवणकर, रांगणेकर, लोटलीकर, वाडीवकर, वेर्णेकर, वेर्लेकर, शिरोडकर, सांगोडकर, हळदणकर,
याशिवाय, ‘कर‘ नसलेलीही गोमंतक आडनावं आढळतात. शेट, शंकरशेट, श्रॉफ, वाळके, वेदक, निलावर वगैरे.
जाणकारांनी, वरील यादीत भर घातल्यास, आभारी होअीन.
— गजानन वामनाचार्य
Leave a Reply