राजकवी यशवंत यांचं हे आडनाव आहे. बरेच वेळा ते ‘पेंढारकर’ असं लिहिलं किंवा अुच्चारलं जातं.
‘पेंढारे’ या गावाला ‘कर’ जोडून हे आडनांव तयार झालं असावं असा प्रथम दर्शनी समज होतो. ‘पेण्ढरकर’ या आडनावावरून राजकवी यशवंत यांचे पूर्वज ‘पेण्ढर’ या मूळ गावाचे रहिवासी असावेत असाही रास्त समज होतो.
पण सुप्रसिद्ध कादंबरीकार कै. ग. त्र्यं. माडखोलकर यांनी राजकवी यशवंतांना सांगितलं की तुमचं मूळ आडनाव ‘पेंढ्रीकर’ असावं. कारण कोंकणात ‘पेंढ्री’ हे गाव आहे. पुढे ‘पेंढ्रीकरां’चं ‘पेण्ढरकर’ झालं. अिंग्रजीत हे नाव लिहित असतांना ‘ढ’ साठी ‘dha’ हे स्पेलिंग करतात आणि वाचतांना ते ‘पेंढारकर’ असं वाचलं जातं.
— गजानन वामनाचार्य
Leave a Reply