आडनावांच्या गमतीजमतींनी मराठी लेखकांना अतकी भुरळ पाडली आहे की, दोनतीन महिन्यात, कोणत्यातरी प्रसारमाध्यमात, कुणीतरी अेखादा लेख लिहीलेला आढळतो. त्यावरून असे लक्षात येते की ह्या गमती जमतींचे गमतीदार वर्गीकरणदेखील करता येते.
प्रसंगांशी सुसंगत किवा विसंगत आडनावे असली म्हणजे काही किस्से निर्माण होतात.
आमच्या कॉलेजात महाशब्दे आडनावाचे अंग्रजीचे प्राध्यापक आणि शब्दे आडनावाचे प्राचार्य होते. वास्तविक शब्दे प्राध्यापक आणि महाशब्दे प्राचार्य असावयास हवे होते.
अेकदा गॅदरिग चालू असतांना ह्या दोघांची, विद्यार्थ्यासमोरच बाचाबाची झाली. तेव्हा आमचा विद्यार्थ्यांचा गट म्हणू लागला, आज शब्दांना महाशब्दांनी प्रत्युत्तरे मिळाली. परिणामी शब्दे आणि महाशब्दे ह्यांची शब्दी-महाशब्दी झडली.
— गजानन वामनाचार्य
नमस्कार.
आपला लेख वाचला. इंटरेस्टिंग माहिती.
माझ्या नातेवाईंकांच्या परिचयात एक महाशब्दे म्हनून गृहस्थ होते. असें कळलें की त्यांचे मूळ आडनांव ‘बोंबमारे’ असे होते; तें बदलून त्यांनी तें ‘महाशब्दे’ असें केलें . अर्थ एकच, पण शब्द चांगलें, अशें त्या आडनांवानें साधलें. (अर्थात, प्रत्येक महाअब्दे याचें आधीचें आडणांव बोंबमारे असेतें, असें मला मुळीच सुचवायचें नाहीं ) .
मराठी लोकांमध्ये जेवठी आडनांवें मिळतात, तेवढी भारतात अन्यत्र कुठेही मिळत नाहींत. एका गृह्थानें या विषयावर पी एच्. डी. केली यावरूनच नषाराष्ट्रीय आडनांवांचें वैविध्य कळून यावे. अनेक आडनांवांची ओरिजीन्स ही इंटरेस्टिंग असतात.
माझ्या असें वाचण्यात आलेलें आहे की, कांहीं कालापूर्वी आडनांवेंच नव्हती. फक्त स्वत:चें नांव व पित्याचें नांव असें सांगत / लिहीत. मात्र, असें दिसतें की, वैदिक काळापासून गोत्रनामांचें प्रस्थ होतें. आजही कांहीं गोत्रनामें ही आडनांवें बनलेली आहेत.
स्नेहादरपूर्वक
सुभाष स. नाईक