कवी यशवंत अुर्फ पेण्ढरकर ‘पुणे ट्रेनिंग कॉलेज फॉर मेन’ या संस्थेत नोकरीला होते. त्या संस्थेत ‘गाढवे’ या आडनावाचे अेक शिक्षक होते. विद्यार्थी त्या आडनावाची खूप चेष्टा करायचे म्हणून पेण्ढरकरांच्या मदतीनं त्या शिक्षकानं ‘गाढवे’ हे आडनाव बदलून ‘तारळेकर’ असं आडनाव धारण केलं. कारण ‘तारळे’ या गावचा तो मूळ रहिवासी होता.
अशारितीनं आडनावात काळानुरूप बदल घडवून आणण्याची सामाजिक प्रक्रिया बरीच जुनी आहे असं म्हणावेसं वाटतं. कुणाची देणी टाळण्यासाठी किंवा कर्जे बुडविण्यासाठीही कांही माणसं आपली आडनावं कायदेशीररित्या बदलायची. परंतू शिक्षकी पेशाला ‘गाढवे’ हे आडनांव हानिकारक आहे म्हणून किंवा पुढील पिढयांतील व्यक्तींची निंदा टाळायची या अुद्देशानं आडनांव बदलणं म्हणजे अेक सामाजिक कलंक धुअून काढण्यासारखं आहे.
– गजानन वामनाचार्य
सोमवार ६ जून २०१६
गाढवे हे आडनाव कलंक कसे.? गाढव हा अत्यंत कष्टाळू कमी खाणारा, आणि जास्त काम करणारा प्राणी आहे.