भाभा अणुसंशोधन केन्द्रातील, अेक संशोधनाधिकारी, अशोक भिमाजी मजली या तरूणानं, त्यांच्या ‘मजली’ या आडनावाची कुळकथा सांगितली ती अशी ::
त्याचं पूर्वीचं आडनाव ‘रामनामे’ असं होतं. खरं म्हणजे त्यापूर्वीचं आडनाव निराळंच होतं. कराडच्या आसपासच्या परिसरात त्यांचं वास्तव्य होतं.
अेकदा समर्थ रामदासस्वामी त्यांच्या घरी मुक्कामास आले. तेव्हा त्यांनी श्रीरामाची मूर्ती आणि प्रचारमंत्र दिला. नंतर या पावन कुटुंबात, रामनामाचे पाठ आणि रामभजन कित्येक वर्षे नियमित चाललं. परिणामी त्या कुटुंबाचं आडनावच ‘रामनामे’ असं रूढ झालं. अजूनही रामनामे आडनावाचे वंशज आहेत.
अेकदा त्या गावावर यवनांचं आक्रमण झालं. त्यामुळे बर्याच कुटुंबांना ते गाव तांतडीनं सोडावं लागलं. त्याकाळी लांबचा प्रवास घोड्यावरून करावा लागे. कुठेही न थांबता किंवा फारशी विश्रांती न घेता, घोड्यावरून केलेल्या प्रवासास अेक ‘मजल’ असं म्हणीत. घोड्याच्या प्रवासक्षमतेचा अंदाज केला तर हे अंतर ५० मैलांपेक्षा कमीच असावं. परंतू यावनी आक्रमणाचे वेळी, गावकर्यांनी, अेकाच मजलीत सुमारे १०० मैलांचं अंतर कापलं आणि बेळगावपासून अंदाजे २० मैलावर पहिला मुक्काम केला. तेथेच गाव वसविलं. म्हणून, पुढे, त्या गावाचं ‘मजली’ हे नाव रूढ झालं. आता हे गाव घटप्रभा धरणाच्या पाण्याखाली गेलं आहे.
या अभूतपूर्व मजलीचं नेतृत्व, रामनामे यांनी केलं होतं म्हणून त्यांचं आडनावही ‘मजली’ असंच रूढ झालं. श्री. अशोक मजली हे त्यांचेच वंशज. (अमृत :: सप्टेंबर 1982)
बव्हंशी कुटुंबांना, त्यांच्या आडनावाची कुळकथा माहित नसते. ज्यांना ती माहित आहे … आख्यायिका असली तरी चालेल ..त्यांनी ती येथे अवश्य कळवावी.
— गजानन वामनाचार्य
रविवार 6 सप्टेंबर 2015.
(मजली या आडनावाची कुळकथा, मी, अमृत मासिकाला पाठविली होती. ती, सप्टेंबर 1982 च्या अंकात प्रसिध्द झालेली आहे.)
शिवनामेहेआडनावसंगममाहुली(सातारा)येथीलघराण्यात आहे.
शिवनामे या आडनावाच्या पानावर ही माहिती टाकण्यााठी मराठीसृष्टीला कळविलं.