महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेत लावणीला अढळ स्थान आहे. लावणी गाता येणार नाही, लावणी नाच करता येणार नाही पण लावणीच्या गाण्यावर लावण्यवती नाचतांना पाहतांना मात्र भान हरपते.
पठ्ठे बापूराव यांनी लावणीला प्रतिष्ठा मिळवून दिली. त्या काळी लावणीच्या स्पर्धा होत असत त्यात पठ्ठे बापूरावांचा फड आघाडीवर असायचा. श्रोते त्यांच्या अलौकिक प्रतिभेला मनापासून दाद देत… कशी … तर शाब्बास पठ्ठे….असं जोरात ओरडून. या शाबासकीची त्यांना अितकी सवय झाली की त्यांनी आपलं मूळचं नाव … श्रीधर कृष्णाजी कुलकर्णी बदलवून पठ्ठे बापूराव हे नाव धारण केलं आणि तेच अजरामर झालं.
पठ्ठे बापूराव हे बहुढंगी व्यक्तीमत्व होतं. त्याचं शिक्षण औंध आणि बडोदा येथे झालं. ते मेकॅनिकल अिंजिनिअर होते पण नोकरी केली पोलीसाची. कुस्तीगीर मल्ल म्हणूनही त्यांनी नाव कमाविलं. पण लोककला तमाशाचं वेड मात्र कधीच सुटलं नाही.
— गजानन वामनाचार्य
(जानेवारी २०१३ च्या अमृत मासिकात प्रकाशित झालेला लेख )
नमस्कार.
पठ्ठे बापूराव यांच्याबद्दलची माहिती इंटरेस्टिंग आहे.
पु.ल. देशपांडे यांनी ‘बटाट्याची चाळ’ हें नांव पठ्ठे बापूरावांच्या मुंबईच्या लावणीतून घेतलेलेंईआहे, असें खुद्द पुलंनीच म्हटलेलें आहे.
-सुभाष नाईक