अेखादे आडनाव मराठी आहे याची खात्री करून घेण्यासाठी निरनिराळया कसोट्या लावाव्या लागतात.
व्यक्तीचे व तिच्या वडिलांचे नाव अुपलब्ध झाल्यास फार अुपयोग होतो. अुदा. ‘रजपूत’ हे आडनाव मराठी नाही अशी प्रथमदर्शनी समजूत होते, पण ‘देवराव बळीराम रजपूत’ आणि ‘नामदेव कृष्णराव रजपूत’ अशी नावे आढळल्यावरून ‘रजपूत’ हे आडनाव मराठी म्हणून ग्राह्य धरले.
तसेच गजानन लक्ष्मण गुजराथी, चिंतामण रामचंद्र क्षत्रिय, माधव रामचंद्र अिंजिनियर वगैरे. कित्येक पिढ्यांपूर्वी परप्रांतातून महाराष्ट्रात आलेली मंडळी येथेच स्थायिक झाल्याचा हा पुरावा आहे.
आदनवाले, वाडिया, मुश्रीफ, तबीब, मुनशी, व्यास, डुबे ही चक्क मराठी मंडळी आहेत.
— गजानन वामनाचार्य
Leave a Reply