रसिकहो ! गदिमांच्या चैत्रबनातील “हमरस्ते” आपल्या सगळ्यांच्याच जिव्हाळ्याचे आणि आवडीचे! पण माझ्या संगतीनं आपण धुंडाळायच्या आहेत आजवर फारशा न मळलेल्या पाऊलवाटा. कारण या वाटांवर मिळणार आहेत अनोख्या रंगांची आणि वेगवेगळ्या ढंगाची गीतफुले!! आपण त्या गीतातील ‘गदिमायीन’ शब्दकळेचा आणि अनवट स्वरसुगंधाचा मनमुराद आस्वाद घेऊया!
Leave a Reply