‘आत्मचित्र’ हे कवयित्री, लेखिका संजीवनी बोकील यांचे सध्या गाजत असलेले नवे पुस्तक! हे पुस्तक म्हणजे अलवारशा ललितलेखांचा एक रंगीत गुच्छच आहे. लेखिकेच्या मनातले सकाराचे सूर्योदय या पुस्तकाच्या पानापानावर तिने मांडून ठेवले आहेत. शालेय मुलींपासून ते ८०/९० वयाच्या वयस्कांनाही आवडणार्या या पुस्तकातली काही भावचित्रे आता आपल्यापुढे अभिवाचनातून सादर होत आहेत. आजच्या भागात अभिवाचन करत आहेत प्रसिद्ध अभिनेत्री मुग्धा गोडबोले- ‘गोष्ट एका शुद्धाची’ या ललितलेखाचे!आपल्या काव्यक्षेत्रातला एक हृद्य अनुभव लेखिकेने यात गुंफला आहे.
Leave a Reply