राजा हरिश्चंद्र – भारतात बनवलेला पहिला चित्रपट

Raja Harishchandra - The First Movie Made in India in 1913

लौकिक अर्थाने भारताचा पहिला मुकचित्रपट म्हणून ज्याची ख्याती आहे असा राजा हरिश्चंद्र ३ मे १९१३ रोजी प्रदर्शित झाला अन् भारतात रुपेरी तसंच मनोरंजन उद्योगाचा उदय झाला, जो आजतागायत सुरु आहे आणि राहील.

दादासाहेब फाळके उर्फ धुंडीराज गोविंद फाळके यांची निर्मिती, दिग्दर्शन, आणि संकल्पनेतून साकार झालेली, भारतीय रुपेरी पडद्यावरील पहिली कलाकृती म्हणजे ”राजा हरिश्चंद्र”. या चित्रपटाची लांबी एकूण ४० मिनिटांची होती. मुंबईतल्या कोरोनेशन थिएटरमध्ये हा चित्रपट पहिल्यांदा प्रदर्शित झाला.

त्याकाळी महिला कलाकारांनी या चित्रपटात काम करण्यास नकार दिल्यामुळे किंबहुना तशी बंदीच असल्यामुळे सर्व स्त्री पात्रांची भूमिका ही पुरुषांनी साकारली होती. या चित्रपटाची कथा राजा हरिश्चंद्र यांच्या जीवनावर आधारीत होती. काही महत्वपूर्ण प्रसंग या चित्रपटामधून त्यावेळच्या कलाकारांनी अगदी समर्थपणे पेलले. या मुकपटाचे सर्व कलाकार मराठीच होते. त्यामुळे मराठी भाषेतला हा पहिला चित्रपट असं रुढार्थाने म्हणता येईल.
चला तर मग, पाहूया… राजा हरिश्चंद्र

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*