
रसिकहो क्षणभर कल्पना करा की साहिब बीबी और गुलाम हा चित्रपट समजा मराठीत निर्माण झाला असता तर, मीना कुमारी ने आपल्या अभिनयाने अजरामर केलेलं ‘न जाओ सैंयाँ छुड़ा के बैंया’ हे गीत मराठीत कस आलं असतं. हे गीत ऐकत असताना मला नेहमी आठवतं ते पारिजात संगितीकेतल गदिमांनी लिहिलेले गीत… जळते मी, हा जळे दिवा. एका चुकीची दुरुस्ती. पारिजात संगितीकेतल हे गीत रुक्मिणी च्या तोंडी नाही तर सत्यभामेच्या तोंडी आहे. चुकीबद्दल क्षमस्व.
Leave a Reply