श्री दत्तस्थान महात्म्य दर्शन ( पिठापूर ) | Shree datta sthan mahatmya darshan ( PITHAPUR )
पिठापुरम हे भारतातील आंध्र प्रदेशातील पूर्व गोदावरी जिल्ह्यात स्थित दत्त क्षेत्र आहे. पीठापुरमला दक्षिणा कासी (किंवा दक्षिण काशी) म्हणूनही ओळखले जाते. पिठापुरम पूर्वी पेठापुरम किंवा पेथीकपुरम म्हणून ओळखलं जात असे. या जागेला १८ शक्तीपीठांपैकी १० वे शक्तीपीठ मानलं जातं. सतीदेवीच्या प्रेताचे काही भाग पडण्याविषयी पौराणिक कथांमध्ये म्हटले आहे की, जेव्हा भगवान शिवने सतीचे शव घेतले आणि भटकले त्यावेळी सतीच्या शवाचे श्रीहरिंनी सुदर्शन चक्राने विभाजन केल्यावर पाठीचा एक भाग पिठापुरला पडल्यामुळे त्या ठिकाणास ‘फुर हुत्तिका शक्ती पीठ’ उत्पन्न झाले. भगवान दत्तात्रेय येथे स्वयंभू होते. याचा अर्थ असा की मंदिरात उपस्थित असलेल्या मूर्ती कोणाच कोरलेल्या नाहीत. त्याऐवजी ते स्वत:हून प्रकट झाले आहेत. इतर दत्त क्षेत्रांप्रमाणे मूर्तीची पूजा येथे केली जाते. श्रीपाद वल्लभ चरिताने हे सिद्ध केले आहे की इ.स. १३५० पासून अप्पाला राजा शर्मा (श्रीपादांचे वडील) यांनी दत्ताची पूजा केली होती.पुढे दत्त महाराजांचे मंदिर उभारले गेले आणि खाली एक औदुंबर वृक्ष लावला गेला ज्याच्या खाली आपण परमेश्वराच्या पायाचे ठसे म्हणजेच पादुका पाहू शकतो. येथे श्रीपादांची मूर्तीही ठेवली आहे.
स्थानिकांचा असा विश्वास आहे की जर कोणी या दत्त मंदिरात गेले आणि त्यांनी आपली इच्छा पूर्ण होण्याची आकांक्षा बाळगली तर त्यांची नक्कीच इच्छापूर्ती होते. इच्छापूर्तीसाठी त्यांनी नारळ बाळगला पाहिजे आणि पूजा केल्यावर नारळ परमेश्वराच्या मूर्तीच्या मागे ठेवल्यावर ३ महिन्यांतच इच्छा पूर्ण होतात असा तेथील सगळ्यांचा विश्वास आहे.
निर्मिती : वासुदेव शाश्वत अभियान, वसई
संकल्पना : सद्गुरू चरणरज पाध्ये काका
Leave a Reply