श्रीमद् जगत्गुरू शंकराचार्य : भाग – १ | Jagadguru Shankaracharya – Part 1
वैशाख शुक्ल पक्ष पंचमी, २८.४.२०२० या दिवशी आद्यशंकराचार्य यांची जयंती. त्या निमित्ताने…
श्री शंकराचार्य यांचा जन्म केरळ प्रांतातील कालाडी या गावी इ.स. ५०० पूर्वी झाला. त्या काळात अन्य पंथियांच्या मतांचा पुष्कळ प्रसार होऊन हिंदु धर्मच संकटात आला होता. प्रचंड बुद्धीमत्ता आणि तपाचरण यांच्या बळावर शंकराचार्यांनी या दोन्ही मतांचा पाडाव करून सनातन वैदिक हिंदु धर्माची पुनर्स्थापन केली. देशाच्या सीमा सदैव सुरक्षित असाव्यात, या हेतूने त्यांनी दक्षिणेला शृंगेरी, पश्चिमेला द्वारका, पूर्वेला जगन्नाथपुरी आणि उत्तरेला बद्रीकेदार अशी ४ पिठे स्थापन केली.
कांचीकामकोटी आणि काशी येथेही त्यांनी पिठे स्थापन केली. वयाच्या केवळ ३२ व्या वर्षी त्यांनी देहत्याग केला.
आजच्या दिवशी त्यांची आठवण म्हणून वासुदेव शाश्वत अभियानाने श्री सचिदानंद शेवडे, महाराजांच्या ओघवत्या वाणीतून सादर केलेले त्यांचे जीवन चरित्र श्रवण करा.
जय गुरुदेव!
— पाध्येकाका
Leave a Reply