नाना व्हरल आवाज उंचावून म्हणाला “मंग? ह्ये अन्ना म्हंजी राजंच हायेत आमचं”!
बामनाच्या पत्र्यासमोर मांडलेल्या मोठ्या दगडावर बसून गदिमांनी पहिला तांब्या डोक्यावर घेतला मात्र, बँडचे सुरेल सूर ऊमटले ‘विझले रत्नदीप नगरात! आता जागे व्हा यदुनाथ’!! गदिमांना राजासारखा मान देणारी ही मंडळी होती तरी कोण? […]