पुजारी, दशरथ

पुजारी दशरथ

दशरथ पुजारी यांचा जन्म ३० ऑगस्ट १९३० रोजी बडोद्यात झाला. त्यांचे शालेय शिक्षण मुंबईतल्या गिरगाव येथे युनियन हायस्कूलमध्ये झाले. त्यांचे वडील वैद्यकीय क्षेत्रात असल्यामुळे पुजारी कुटुंबीयांचे सोलापूर, बार्शी, पंढरपूर अशा विविध ठिकाणी वास्तव्य होत असे. बार्शीच्या गोपाळराव भातंब्रेकर गुरुजींकडून दहरथ पुजारी यांनी संगीताचे व गायनाचे धडे घेतले, आणि पंडित लक्ष्मणप्रसाद जयपूरवाले यांच्याकडून जयपूर घराण्याची तालीम घेतली होती. वयाच्या अवघ्या १८ वर्षांपासूनच दशरथ पुजारींनी संगीत दिग्दर्शनाच्या कारकीर्दीस सुरुवात केली.मुंबई आकाशवाणीच्या संगीत विभागात अनेक वर्ष पुजारी कार्यरत होते. तसंच संगीत-संयोजक अनिल मोहिले हे उमेदवारीच्या काळात दशरथ पुजारींचे सहाय्यक होते. दशरथ पुजारी हे स्वतः उत्कृष्ट हार्मोनियम वादकही असल्यामुळे मराठी भावगीते व भक्तीगीतांना अवीट गोडीची संगीत प्राप्ती सोबतच वैविधता ऐकायला मिळाली.

दशरथ पुजारी यांनी आपल्या संगीतिक कारकीर्दीत मंगेश पाडगावकर, रमेश आणावकर, शांताराम नांदगावकर, कवि सुधांशु, योगेश्‍वर अभ्यंकर, मधुकर जोशी अश्या नामवंत गीतकारांच्या गाण्यांना चाली बांधल्या. यापैकी काही लोकप्रिय ठरलेली गाणी म्हणजे ‘झिमझिम झरती श्रावणधारा’,’अशीच अमुची आई असती’,’देव माझा विठू सावळा’,’केशवा, माधवा, तुझ्या नामात रे गोडवा’,’नकळत सारे घडले’,’मुरलीधर घनश्याम’,’मृदुल करांनी छेडित तारा’,’सावळ्या विठ्ठला तुझ्या दारी आले’.

संगीत क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल चतुरंग प्रतिष्ठान आणि म्हैसकर फाऊंडेशनतर्फे दिल्या जाणार्‍या ”चतुरंग संगीत सन्मान” ने दशरथ पुजारींना गौरवण्यात आले होते. संगीतकार दशरथ पुजारींनी “अजून त्या झुडपांच्या मागे” हे आत्मचरित्रपर पुस्तकही लिहिले आहे.

दिनांक १३ एप्रिल २००८ या दिवशी कर्करोगाच्या दिर्घ आजाराने डोंबिवली येथे दशरथ पुजारींचे निधन झाले.
दशरथ पुजारींचे मराठीसृष्टीवरील लेख.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*