ठाण्यात चित्रकला क्षेत्रातील अनेक मातब्बर कलाकार वास्तव्य करतात. अशा कलाकारांमधीलच एक नाव म्हणजे सौ. माणिक राज शिंगे हे होय. चित्रकला आणि कला अध्यापक म्हणून काम करणार्या माणिक राज शिंगे यांनी फाईन आर्टमध्ये ए.टी.जी.डी. ही पदवी तसेच डीप.ए.एड. ही पदविका संपादन केली आहे.
१९८३ मध्ये जी.डी. आर्ट झाल्यानंतर माणिक शिंगे यांनी कला निर्मितीचे सातत्य ठेवले आहे. त्यांची मुंबई, दिल्ली, कलकत्ता, सिंगापूर येथे अनेक चित्र प्रदर्शने झाली आहेत. त्यांनी प्रामुख्याने स्त्री-जीवनावर भाष्य करणारी कला निर्मिती केली आहे. ठाण्यातील बालचित्रकारांना प्रोत्साहन व मार्गदर्शन करणे, तसेच प्रशिक्षित कला अध्यापकांना दिशा देण्याचे काम त्या वेळोवेळी करत असतात. त्यांनी ठाणे येथे हायकू या छोटेखानी कलादालनाची निर्मिती केली आहे. ठाण्यातील नागरिकांमध्ये चित्रकलेची आवड व जाण निर्माण करण्याचा त्या प्रयत्न करत असतात.
बॉम्बे आर्ट सोसायटीची बेंद्र हुसेन शिष्यवृत्ती २००४ मिळाली.
Leave a Reply