शिंगे, राज वसंत

शिंगे, राज वसंत

सर जे.जे. स्कूल ऑफ अप्लाइड आर्ट तसेच सर जे.जे स्कुल ऑफ आर्ट मधून राज शिंगे यांनी जी.डी.आर्ट व जी.डी. आर्ट मेटल या पदव्या प्राप्त केल्या. कलानिर्मितीचा ध्यास घेतलेल्या राज शिंगे यांनी आपल्या कलाप्रवासाला १९८५ सालापासून सुरुवात केली. आपल्या कलेच्या ध्यासापोटी त्यांनी चीन, अथेन्स, श्रीलंका यांसरख्या देशांत काही काळ प्रवास केला. देशविदेशांत कलामाध्यमातून कला प्रदर्शने, कार्यशाळा राबविल्या. ठाण्यातील हायकू कला दालनाची व बाल चित्रकारांसाठी कला योजना प्रदर्शने व कार्यशाळा राबविणे हे त्यांचे विशेष.

राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील कला प्रदर्शनात सहभागी होणारे राज शिंगे यांनी समाजाचा एक घटक या नात्याने अनेक सामाजिक उपक्रम हाती घेतले. मतिमंद मुलांसाठी कला शिकवणे, डॉक्युमेंटरी व त्यांचा अभ्यास, कलेबाबत मार्गदर्शन करणे व कलेचा उत्कर्ष करणे हेच ते आपले कार्य मानतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*