मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीवर आपल्या अभिनयाने एक वेगळा ठसा उमटविणारे उदय सबनीस हे तर ठाण्यातील एक प्रसिद्ध व लाडकं व्यक्तिमत्व आहे.
“रंजन युवा मंच” ह्या संस्थेतून त्यांनी स्वत:च्या कारकिर्दीची सुरुवात केली. ठाण्यातील कलासरगम या नाट्यसंस्थेतून त्यांनी एकांकिका केल्या. हा त्यांच्या आयुष्यातील एक महत्वाचा टप्पा होता. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेतही सहभाग घेतला होता.
१९८८ साली त्यांचं पहिलं नाटक “सूर्याची पिल्ले” रंगभूमीवर आलं आणि त्यानंतर मात्र त्यांची कारकीर्द तळपतच राहिली. २५ नाटकं, ५० मालिका, ३० सिनेमे, व ५ हिंदी सिनेमे तसेच इंग्रजी व फ्रेंच सिनेमांमध्ये काम करुन त्यांनी आपला अभिनय वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवला आणि आज ते एक प्रसिद्ध अभिनेते म्हणून ओळखले जातात.
त्यांनी कार्टून नेटवर्क, डिजनी, डिस्कव्हरी, हिस्टरी या चॅनेल्सवर व्हॉईसओव्हर आर्टिस्ट म्हणूनही काम केलं आहे.
अधिक विस्तृत माहितीसाठी खालील लेख वाचा :
Leave a Reply