चाळीस वर्षांवरील गायकांसाठीच्या झी सारेगमपच्या पर्वाच्या उपविजेत्या अनुजा वर्तक या ठाणे शहराला अभिमान वाटणार्या व्यक्तींमधील एक ! कल्याण गायन समाज येथे पं. वसंतराव गोसावी यांच्याकडे वर्तक यांनी शास्त्रीय संगीताचे प्राथमिक शिक्षण घेतले. त्यानंतर कै. विलास डफळापूर व पं. यशवंत देव यांच्याकडे सुगम संगीताचे धडे गिरवले. आपल्या गायनाच्या कारकीर्दीत श्री. ओ.पी. नय्यर यांचे देखील मौल्यवान मार्गदर्शन त्यांना लाभले. सुरेश वाडकर, रविंद्र साठे, उपेंद्र भट, उषा मंगेशकर, उत्तरा केळकर इत्यादी प्रतिथयश कलाकारांबरोबर वर्तक यांनी असंख्य कार्यक्रम केले आहे. तसेच अनेक मालिकांसाठी पार्श्वगायन केले आहे. गायम सांभाळता सांभाळता २६ वर्षे एका खाजगी बॅंकेत नोकरी करुन त्यांनी आता स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे.
पुरस्कार : पु. ल. देशपांडे यांच्या हस्ते मानपत्र मिळाले.
<!–
– गायिका
पत्ता : ४८/४, अनिल को. ऑप हौ. सोसायटी, गावंड पथ,
नौपाडा, मल्हार सिनेमाजवळ, ठाणे (प.) ४००६०२
कार्यक्षेत्र : संगीत (गायन)
भ्रमणध्वनी : ९८१९७००२५८
ई-मेल : anujavartak@gmail.com
–>
Leave a Reply