जोशी, मुक्ता

भारत सरकारतर्फे “अ” क्षेत्राच्या कथ्थक नृत्यांगना म्हणून मान्यता मिळालेल्या आणि गेली तीस वर्षे नृत्य क्षेत्रात कार्यरत असलेल्या मुक्ता जोशी या ठाण्यातील कलारत्नांपैकी एक ! ठाण्याच नाव कोरिया, चीन, कंबोडिया, ग्रीस या देशांमध्ये पोहोचवण्याचा आणि उज्वल करण्याचा मान मुक्ता जोशी यांच्याकडे जातो. तसंच ठाणे व कल्याण भागात गेली पंचवीस वर्षे त्या कथ्थक नृत्याचा प्रचार करीत आहेत. “नृत्यधारा” ही स्वत:ची नृत्यसंस्थासुरु करुन त्यांनी ठाण्यातील १५० विद्यार्थीनींना भारतात आणि भारताबाहेर घेऊन जाऊन तिथल्या अनेक महोत्सवात भारतीय संस्कृतीचं दर्शन घडवलं. ठाण्यात शास्त्रीय नृत्याचे व त्यातही जयपूर शैलीचे कथ्थक नृत्य शिकवणे हे त्यांचे वेगळेपण! कथ्थक-लावणी जुगलबंदीचा कार्यक्रम त्यांनी महाराष्ट्र सरकारतर्फे भारतात अनेक ठिकाणी केला आहे.  

आजतागायत मुक्ता जोशी यांना अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*