राजवाडे, विनय नारायण

संगीतकार तसेच गायक म्हणून प्रसिद्ध असलेले विनय राजवाडे हे ठाणेकर आहेत व आजच्या आणि उद्याच्या ठाण्याबद्दलच्या त्यांच्या कल्पना ह्या अगदी साध्या परंतु महत्वाच्या आहेत.

ठाणे शहराचा सांस्कृतिक इतिहास सांगणारी नांदी (कवी उत्तम जोशी, गायक अनेक नामवंत कलाकार), ठाणे स्वाभिमान गीत (८४ वे अखिल भारतीय मराठी शालेय संमेलन – ठाणे २०१०) (कवी राजेंद्र वैद्य, गायक ८४ शालेय महाविद्यालयीन विद्यार्थी) या दोन्ही गीतांना संगीत विनय राजवाडे यांचेच होते. त्यांच्या या क्षेत्रात प्रवास सुरु आहे व त्या दरम्यान त्यांना स्व. श्रीनिवास खळे तसेच कविवर्य मंगेश पाडगावकर यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले.

बायोटेक्नॉलॉजी मध्ये एम.एस.सी. करणार्‍या विनय राजवाडे यांचे शास्त्रीय संगीताचे शिक्षण पंडित एकनाथपंत कुलकर्णी, पं.वाय.टी. वैद्य, डॉ. विद्याधर ओक यांच्याकडे झाले. संगीतकार लक्ष्मीकांत यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभवही विनय राजवाडे यांना आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*