अच्युत ठाकूर हे गेल्या ४० हून अधिक वर्षांपासून संगीत क्षेत्रात कार्यरत होते. ठाकूर यांचे मूळ गाव अलिबागजवळचं कोपर हे. घरची पार्श्वभूमी संगीताची. त्यांनी सुरुवातीचे संगीताचे धडे पं. शिवरामबुवा वरळीकर यांच्याकडे त्यांनी घेतले होते. पुढे या क्षेत्रातील त्यांचे गुरू पं. प्रभाकर म्हात्रे, आचार्य डी. पी. अडसूळ, खाँ साहेब गुलाम खाजाँ, पं. यशवंतबुवा जोशी, विश्वनाथ मोरे हे होत.
मुंबईत आल्यावर त्यांनी गांधर्व महाविद्यालयातून ‘संगीत विशारद’केले. संगीतकार विश्वनाथ मोरे यांच्याकडे त्यांनी सात वर्षे सहाय्यक म्हणून काम केले.
१९८३ साली ‘श्री रामायण’हा मराठी चित्रपट त्यांनी संगीतबद्ध केलेला पहिला चित्रपट होता. त्यातली गाणी त्या वेळी गाजली होती. त्यानंतर ‘सौभाग्य वैंकण’, ‘पैज लग्नाची’,‘घे भरारी’,‘सत्ताधीश’,‘गृहलक्ष्मी’,‘सख्खा भाऊ पक्का वैरी’,‘आता लग्नाला चला’,‘सर्जा राजा’,‘मर्मबंध’,‘चिमणी पाखरं’,‘तुझा दुरावा’,‘विठाबाई’ अशा अनेक चित्रपटांना त्यांनी संगीत दिले. ‘चिमणी पाखरं’हा चित्रपट तर गाण्यांसाठी खूप गाजला.
अनेक नाटकांनाही अच्युत ठाकूर यांनी संगीत दिले होते. ‘चूप गुपचूप’,‘नटरंग’, ‘तीन पैशांचा तमाशा’,‘जांभूळ आख्यान’तसेच आगरी भाषेतलं ‘हा वनवा ईझेल का’ही नाटके रंगभूमीवर फार गाजली.
जवळजवळ त्यांनी ४० हून अधिक चित्रपटांना संगीत दिले होते, तसेच तर २० नाटकांना संगीत दिली होते. ‘जांभूळ आख्यान’ हे त्यांनी संगीतबद्ध केलेले नाटक आज ३० हून अधिक वर्षे चालू आहे, तर ‘पैज लग्नाची’ आणि ‘मर्मबंध’ या चित्रपटांना संगीतकार, गायक म्हणून त्यांना दोन-दोन राज्य पुरस्कार मिळाले होते.
अच्युत ठाकूर यांच्याविषयी आपल्या वेबसाईट वरील संजीव वेलणकर यांचा विस्तृत लेख.
Leave a Reply