अपर्णा संत

गायिका

अपर्णा संत यांचे शास्त्रीय संगीताचे शिक्षण श्री बैरागी बुवा, प्रभाकर जोशी. त्यांचा जन्म ९ ऑगस्ट १९७० रोजी झाला. श्रीमती वसुमती भागवत यांच्याकडे कोरेगाव आणि सातारा येथे झाले. श्रीमद् भगवद् गीतेतील  तत्त्वज्ञान सांगणाऱ्या पंचवीस हिंदी व पंचवीस मराठी गाण्यांना अपर्णा संत यांनी चाली दिल्या आहेत. सध्या हा कार्यक्रम अपर्णा संत व आर्या आंबेकर सादर करत असतात.

अपर्णा संत या भावसंगीत व चित्रपट संगीतावरील सांगीतिक विश्लेषणात्मक कार्यक्रम सादर करतात. संगीतकार मदन मोहन किंवा इतर अनेक संगीतकारांवरचे संगीतकारांच्या विविध सांगीतिक परिभाषेतील बद्दलचे कार्यक्रम त्या त्यांच्या विद्यार्थिनींना घेऊन कार्यक्रम सादर करत असतात.

‘गुरुवंदन’, ‘मधुबोली’, ‘इंडेमाऊ ची गाणी’ (बालगीते), ‘ही बहिण बहिणाबाईची’ हे अल्बम अपर्णा संत यांनी संगीत बद्ध केले आहेत. या अल्बम्स मध्ये सुरेश वाडकर, रवींद्र साठे, स्वप्निल बांदोडकर. आर्या आंबेकर. प्रियांका बर्वे प्रांजली बर्वे यांनी आवाज दिलेला आहे. तसेच शांताबाई शेळके यांच्या कवितांवर कार्यक्रम हे सर्व कार्यक्रम अपर्णा संत यांनी बसवलेले आहेत.

अपर्णा संत यांना गाण्यासाठी उषा अत्रे पुरस्कार व रोटरी क्लब कडून पुरस्कार मिळाला आहे. त्यांचा आगामी प्रोजेक्ट म्हणजे सुधीर मोघे यांच्या कवितांचा रंगमंचीय अविष्कार सादर करणे.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*