“जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा” अशी गर्जना करून शाहीरी परंपरा अगदी अलिकडच्या काळापर्यंत जपून ठेवणारे शाहीर म्हणजे शाहीर कृष्णा गणपत साबळे यांचा जन्म ३ सप्टेंबर १९२३ रोजी झाला.
अमळनेरला असताना साने गुरुजींचा सहवास शाहिरांना लाभला. पुढे मोठेपणीही चळवळीत गुरुजींचा आशीर्वाद मिळाला. त्यांच्या अनेक सामाजिक कार्यात शाहिरांना सक्रिय सहभाग घेतला. लहान वयात लोककलांचा आणि लोकगीतांचा संस्कार त्यांच्यावर झाला होता आणि मुंबईला आल्यावर या लोककलेचे नेटके रूप विशिष्ट संहितेसह समाजासमोर आणायचे, असा विचार शाहिरांनी केला आणि महाराष्ट्राची लोकधारा या लोककलेच्या देखण्या रूपाचा जन्म झाला.
लोककलावंतांना मानधन मिळवून देण्यात त्यांचा सहभाग हा निश्चिनतच महत्त्वाचा आहे. शाहीर साबळे म्हटले, की सर्वांत प्रथम लक्षात येते ते त्यांचे महाराष्ट्र गीत व नंतर त्यांनी लोकप्रिय केलेली लोकगीते, भारुडे. शाहिरांना त्यांच्या कार्याबद्दल अनेक मानसन्मान व पुरस्कार मिळाले.
“जय जय महाराष्ट्र माझा‘प्रमाणेच “हरे कृष्णा हरे कान्हा‘, “दादला नको ग बाई‘, “आठशे खिडक्याज नऊशे दारं‘, “विंचू चावला‘, “या विठूचा‘, “आज पेटली उत्तर सीमा‘, “पयलं नमन‘, “बिकट वाट वहिवाट नसावी‘ आणि “मल्हार वारी मोतीयाने द्यावी भरून‘ आदी त्यांच्या आवाजातील विविध प्रकारची गाणी तुफान लोकप्रिय झाली. “माझा पवाडा‘ हे त्यांचे आत्मचरित्र २००७ मध्ये प्रसिद्ध झाले.
शाहीर साबळे यांचे २० मार्च २०१५ रोजी निधन झाले.
Leave a Reply