दिनकर बळवंत देवधर

दिनकर बळवंत देवधर यांचा जन्म १४ जानेवारी १८९२ रोजी झाला.

दिनकर बळवंत देवधर यांचे शिक्षण पुण्याच्या नूतन मराठी विद्यालयात झाले. १९०६ मध्ये वयाच्या १४ व्या वर्षी त्यांनी कँपमधील एका शाळेविरुद्ध शतक काढले. दोन वर्षांतच शालेय संघाचे नायकपद त्यांच्याकडे आले. शालेय शिक्षणानंतर ते फर्ग्युसन कॉलेजात दाखल झाले.

देवधरांच्या नेतृत्त्वाखाली महाराष्ट्राने १९३९-४० आणि १९४०-४१ या लागोपाठच्या वर्षांमध्ये रणजी करंडक जिंकला. १८५० च्या सुमारास पार्शांनी झोरास्ट्रियन क्लब स्थापन करून संघटित क्रिकेट खेळण्यास प्रारंभ केला होता. १८८५ आणि १८८७ मध्ये त्यांच्या संघाने परदेश दौरे केले. त्याकाळी पुणे आणि मुंबईत भारतात नोकरीसाठी आलेल्या इंग्रजांचा संघ विरुद्ध पारशी संघ अशी वार्षिक लढत प्रेसिडेन्सी सामने या नावाने खेळली जाई. १८९५ ते १९०६ या काळात ही स्पर्धा चालली. १९०७ मध्ये हिंदूंचा संघ या स्पर्धेत सामील झाला आणि ही स्पर्धा तिरंगी झाली.

दि.ब. देवधर यांची कारकीर्द.

८१ सामने, १३३ डाव, १८ वेळा नाबाद, ४५२२ धावा, २४६ सर्वोच्च, प्रतिडाव ३४.०० धावा, ९ शतके, २७ अर्धशतके, ७० झेल. २४६ धावा वयाच्या अठ्ठेचाळिसाव्या वर्षी मुंबईविरुद्ध रणजी करंडकात.

क्रिकेट महर्षी दि ब देवधर यांचे निधन २४ ऑगस्ट १९९३ रोजी झाले.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*