पांडुरंग सातू नाईक

जुन्या काळातील चित्रपट छायालेखक पांडुरंग सातू नाईक यांना आल्हाददायकता, कल्पकता व वास्तवता ही वैशिष्ट्ये असलेले चित्रपट छायालेखक म्हणून ओळखले जायचे.

पांडुरंग सातू नाईक यांचा जन्म १३ डिसेंबर १८९९ रोजी गोव्यातील म्हार्दोळ या गावी झाला.

पांडुरंग सातू नाईक यांचे शिक्षण मराठी तिसऱ्या इयत्तेपर्यंत. १९१५ साली ते मुंबईला गेले. तेथे दादासाहेब फाळके यांच्या चित्रपटसंस्थेत प्रवेश करून छायाचित्रणातील अगदी प्राथमिक धडे फाळके यांच्या हाताखाली घेतले.

१९३४ मध्ये छायाचित्रणाचे अद्ययावत शिक्षण घेण्यासाठी ते जर्मनी, फ्रान्स, इटली, इंग्लंड या देशांत गेले होते. परदेशातून आल्यावर इंपीरिअल फिल्म कंपनीत त्यांनी प्रवेश केला.

१९३६ साली मास्टर विनायक व बाबूराव पेंढारकर यांच्या भागीत हंस पिक्चर्सची स्थापना करून त्यांनी छाया (१९३६), धर्मवीर, प्रेमवीर (१९३७), ब्रह्मचारी, ज्वाला (१९३८), ब्रँडीची बाटली, देवता, सुखाचा शोध (१९३९), अर्धांगी (१९४०) या गाजलेल्या चित्रपटांचे उत्कृष्ट छायाचित्रण केले; तर १९४० मध्ये आचार्य अत्रे, बाबूराव पेंढारकर, विनायक व राजगुरू यांच्या नवयुग फिल्म कंपनीचा लग्न पहावं करून (१९४०) हा चित्रपट पांडुरंग नाईक यांनी चित्रित केला होता.

१९४२ साली बाबूराव पेंढारकर व पांडुरंग नाईक यांनी न्यू हंस या चित्रपटसंस्थेची स्थापना केली. या संस्थेने पहिला पाळणा, भक्त दामाजी (१९४२) व पैसा बोलतो आहे (१९४३) हे चित्रपट सादर केले. त्यांचे छायालेखन नाईकांनीच केले होते.

आल्हाददायकता, कल्पकता व वास्तवता हे त्यांच्या छायालेखनाचे वैशिष्ट्ये होते.

पांडुरंग सातू नाईक यांचे २१ ऑगस्ट १९७६ रोजी निधन झाले.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*