विविध मालिकांतून आपल्या करारी व्यक्तिमत्वाचा ठसा उमटवणारी रसिकांची लाडकी बंडखोर लेखिका प्रिया तेंडूलकर यांचा जन्म १९ ऑक्टोबर १९५४ रोजी झाला.
प्रिया तेंडूलकर या प्रख्यात साहित्यिक व नाटककार विजय तेंडुलकर यांच्या कन्या. प्रिया लहानपणापासून ती ज्यांना आदर्श मानायची, ते वडील हे तिचे सर्वोत्तम मित्र होते. लहानपणी ती एकदम दुबळी, लाजाळू, रडूबाई होती.
तेंडुलकरांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात एका पंचतारांकित हॉटेलमध्ये वेट्रेसची नोकरी करून केली. त्याच प्रिया तेंडुलकरने नंतर बँक कर्मचारी, मॉडेल, हवाई सुंदरी, अभिनेत्री, साहित्यिका, पत्रकार, चित्रवाणी मालिकांतील यशस्वी सूत्रसंचालिका – अशा निरनिराळया भूमिका जीवनात यशस्वीपणे वठवल्या.
बासू चतर्जींनी तिला ‘रजनी’ या दैनंदिन जीवनातील अन्यायाविरूध्द लढणा-या सामान्य गृहिणीची मालिका दूरदर्शनसाठी करायला लावली आणि या मालिकेने प्रिया तेंडूलकर या नावाला ख-या अर्थाने वलय मिळवून दिले. अगदी अलीकडे त्यांनी ‘प्रिया तेंडूलकर टॉक शो’ सुरू केला.
श्याम बेनेगल यांना १९७४ साली ‘अंकुर’ चित्रपट बनवताना त्यातील अनंत नागच्या पत्नीच्या भूमिकेसाठी तिला घ्यावेसे वाटले आणि ही अभिनेत्रीही बनून गेली. ‘गोंधळात गोंधळ’, ‘माळावरचं फूल’, ‘मायबाप’, ‘देवता’, ‘राणीने डाव जिंकला’, ‘मुंबईचा फौजदार’, ‘माहेरची माणसं’, ‘सस्ती दुल्हन महँगा दुल्हा’, ‘कालचक्र’, ‘माझं सौभग्य’, ‘हे गीत जीवनाचे’, ‘और प्यार हो गया’, अशा चित्रपटांत, त्यांनी भूमिका केल्या.
प्रिया तेंडुलकर यांचे १९ सप्टेंबर २००२ रोजी निधन झाले.
Leave a Reply