रमेश देव यांचं आडनाव खरे तर ठाकूर देव यांचे बालपण कोल्हापुरात गेले.त्यांचा जन्म ३० जानेवारी १९२९ रोजी झाला.
राजर्षी शाहू महाराजांमुळे त्यांचं आडनाव देव झालं. देव यांचे वडील त्या काळचे प्रसिद्ध फौजदारी वकील. महाराजांनी दिलेल्या स्कॉलरशिपवरच ते वकील झाले होते. एकदा एका कामात त्यांनी महाराजांना मदत केली तेव्हा महाराज म्हणाले, “”ठाकूर, तुम्ही देवासारखे भेटलात. तुम्ही आता ठाकूर नाही – देवच!‘‘ आणि तेव्हापासून या परिवाराचे देव हेच आडनाव झालं.
पु. ल. देशपांडे यांनी एका चित्रपटातील भूमिका नाकारली म्हणून देव यांना चित्रपटात संधी मिळाली. रमेश देव यांनी आजवर पाचशेहून अधिक मराठी आणि हिंदी चित्रपट केले. आई, गुरू राजा परांजपे आणि पत्नी सीमा यांच्यामुळेच “रमेश देव‘ अशी वेगळी ओळख निर्माण झाली हे मात्र नक्की.‘‘ रमेश देव म्हणजे राजबिंडा नट. त्या काळात त्यांच्या देखणेपणावर अनेक मुली फिदा असायच्या.
१९५७ च्या सुमारास रमेश देव व सीमा (नलिनी सराफ) या दोघांचीही रूपेरी कारकीर्द सुरू झाली. “आलिया भोगाशी‘ चित्रपटाच्या निमित्ताने त्यांची सीमा यांच्याशी पहिली भेट झाली आणि त्यानंतर सहा वर्षांनी एक जुलै १९५३ ला त्यांचा विवाह झाला.
रमेश देवांच्या शिवाय मराठी चित्रपटसृष्टीचा इतिहासच पूर्ण होऊ शकत नाही, एवढे मोठे योगदान त्यांचे आहे. एक काळ तर असा होता, की रमेश आणि त्यांची पत्नी सीमा देव चित्रपटात असतील तर तो हीट होणार अशी खात्री असायची.
‘भिंगरी’ चित्रपटात त्यांनी साकारलेला खलनायक अविस्मरणीयच. मराठीत यापूर्वी खलनायक रूबाबदार असू शकतो ही संकल्पनाच नव्हती. रमेश देव यांनी खलनायकी भूमिकेला ग्लॅमर मिळवून दिले.तरीही त्यांनी स्वतला विशिष्ट परिघात अडकवून न घेता चौफेर मुशाफिरी केली. त्यांनी नायक, सहनायक, चरित्र अभिनेता ते खलनायक अशा सर्वच भूमिका केल्या.
निर्माता, दिग्दर्शक अशा विविध प्रांतातही ठसा उमटवला. त्याचा ‘सर्जा’ हा ऐताहासिक पार्श्वभूमी असलेला चित्रपट चांगलाच गाजला. अनेक हिंदी चित्रपटातही त्यांनी उत्तमोत्तम भूमिका केल्या. ऋषीकेश मुखर्जींच्या ‘आनंद’ चित्रपटात राजेश खन्नाचा डॉक्टर मित्र खरोखरीच मनापासून रंगवला. त्यांच्या या भूमिकेला दादही मिळाली. रमेश देव या व्यक्तीमध्ये उत्कृष्ट नायक होण्यासाठी लागणारे सौदर्य, मेहनत, अभिनय कौशल्य अशा सर्वच गोष्टी होत्या.
रमेश देव यांनी आपल्या दीर्घ कारकिर्दीत २८५ हून अधिक हिंदी चित्रपट, १९० मराठी चित्रपट आणि ३० मराठी नाटकांमध्ये २०० हून अधिक शो केले.
त्यांनी फीचर फिल्म्स, टेलिव्हिजन मालिका आणि २५० हून अधिक जाहिरात चित्रपटांची निर्मिती देखील केली.
त्यांनी अनेक चित्रपट, माहितीपट आणि दूरदर्शन मालिका देखील दिग्दर्शित केल्या.
रमेश देव यांचे चिरंजीव अजिंक्य देव अभिनेता व दिग्दर्शक आहेत तर दुसरे चिरंजीव अभिनव हा दिग्दर्शक आहे.
Leave a Reply