एच. के. जावळे हे जेव्हापासून ठाणे जिल्हा परिषदेच्या विशेष कार्यकारी अधिकारीपदी रूजू झाले त्यावेळेपासून जिल्ह्यातील शासकीय व निमशासकीय यंत्रणां व अधिकार्यांच्या कार्यपद्धतीमध्ये अमुलाग्र बदल घडून आला.
अफाट कार्यक्षमता व परिषदेच्या कार्याची व्याप्ती वाढविणारे, तसेच सामाजिक व राजकीय विकासकार्यांमध्ये हिरीरीने सहभागी होणारे राजकीय नेतृत्व अशी ओळख एच. के. जावळे यांनी निर्माण केली आहे. राज्य शासनाच्या डोंगराळ भागांमध्ये राहणार्या आदिवासींसाठीच्या योजनांचे जास्तीतजास्त फायदे त्यांना मिळवून देण्याचा सतुत्य प्रयत्न केला आहे. इंग्रजीचे महत्व जाणून त्यांनी सर्वप्रथम ठाणे आदिवासी पाडयांमध्ये, २६ ठिकाणी “इंग्रजी नर्सरी” सुरू केल्या तर, शहरी भागातील लोकांना आपल्या या विकासयात्रेमध्ये खेचून घेण्यात त्यांचा महत्वाचा वाटा होता. लोकसहभागातूनच या बालवाड्यांसाठी उत्तम प्रतीच्या व आधुनिक पायाभूत सुविधा बांधण्यात आल्या. “इस्कॉन फुड रिलीफ फाउंडेशन” व “नाईक फाउंडेशन” तर्फे काही शाळांना सात्विक व पोषक मध्यान्न आहार पुरविला जातो. या महत्वाकांक्षी प्रकल्पाला तडीस नेणारे शिल्पकार म्हणून जावळे यांच्याकडे पाहिलं जातं. इस्कॉन फुड रिलीफ फाउंडेशन तसेच भिवंडी, पालघर व वाडा या तालुक्यांमध्ये मध्यवर्ती भोजनालय सुरू करण्याची मुळ संकल्पना सुध्दा एच. के. जावळेंच होती. ठाणे जिल्ह्यामध्ये व्हर्चुअल क्लासरूम ची संकल्पना अधिक प्रभावशालीपणे व विस्तारीत स्वरूपावर खेड्यात देखील कशी राबवता येईल, यादृष्टीने या विषयावरती सखोल आभ्यास सुरू आहे व त्यामुळे या संकल्पनेने आपली मुळे रोवण्यास सुरूवात केलं असल्याचे प्रकर्षाने जाणवते. आदिवासी समाजाच्या आर्थिक, सामाजिक, व राजकीय विकासाचा दर वाढविण्यासाठी आदिवासी व ग्रामीण जनतेला अद्ययावत आरोग्य सल्ला व सुविधांचा लाभ देणे, आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांना प्रशिक्षित करुन, जिल्हा परिषद शिक्षक व विद्यार्थ्यांना आवश्यक कौशल्यवृध्दी, व्यवसयाभिमुख विषय व तज्ञांचे मार्गदर्शन करण्याचे कार्य पार पाडले आहे.
Leave a Reply